जत : आमदार गोपीचंद पडळकर युथ फाऊंडेशनच्या वतीने शिक्षण दिनानिमित्त जत तालुक्यातील आदर्श शिक्षकांना पुरस्कार व सन्मान सोहळा रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे,अशी माहिती भाजपा नेते डॉ.रविंद्र आरळी व फाउंडेशनचे संजय तेली यांनी दिली.जत तालुक्यातील अनेक शिक्षक तालुक्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवत प्रयत्न करत आहेत.
त्यांच्या या प्रयत्नांना कौतुकाची थाप देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर फाउंडेशनच्या वतीने हा भव्य असा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.या सोहळ्यासाठी परमपूज्य डॉ.अमृतानंद स्वामीजी गुरुदेव आश्रम बालगाव यांचे दिव्य सानिध्य लाभणार असून माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत,सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ.रवींद्र आरळी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर गट विकास अधिकारी राम फरकांडे,शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख यांच्यासह विनायक शिंदे संभाजी जगताप,राजेश कोळी,दिलीप पवार,दिगंबर सावंत भारत क्षीरसागर,संतोष काटे,गुरुबसू वाघोली, सिद्धेश्वर कोरे,लखन होनमोरे आदी शिक्षक नेते व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजकांकडून करण्यात आले आहे.