कुंडल : पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यास देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा प्रतिष्ठेचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे मंगळवारी (२२ सप्टेंबर) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कारखाना व्यवस्थापनाला पुरस्कार देण्यात आला.
धनगावमध्ये कृष्णा नदीत अजस्त्र मगर
पलूस : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धनगाव परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात अजस्त्र मगर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठच्या परिसरात मगरीचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. त्यामुळे नदीकाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मगरीचा वावर नेमका कोणत्या भागात आहे, याबाबत वन विभागाकडून पाहणी अपेक्षित आहे.




