५०० रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणल्या जात आहेत. खोट्या २ लाख रुपयांच्या बदल्यात खरे १ लाख रूपये घेतले जायचे. या नोटा छपाईसाठी ऑनलाइन कोलकाता येथून कागद मागविला जात होता. बीड शहर पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपी निष्पन्न केले असून, एका अल्पवयीनसह दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत २० लाख रुपयांची छपाई केली असून, त्यातील १० लाख रूपये मार्केटमध्ये असल्याचेही समोर आले आहे.
आकाश रमेश जाधव (रा. माळेगल्ली अजिजपुरा ह.मु. सोमेश्वर नगर, बीड) याच्यासह एक अल्पवयीन आरोपी ताब्यात आहे. १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता बीड शहर पोलिसांनी सापळा लावून किराणा साहित्य खरेदीसाठी येताच आकाशला ताब्यात घेतले होते त्याच्याकडून ५०० रुपयांच्या चार खोट्या नोटाही जप्त केल्या होत्या. याच्याच मुळाशी जाऊन तपास केल्यावर यातील म्होरक्या दुसराच असून, तो आपल्या घरी नोटांची छपाई करत असल्याचे समोर आले. आकाशला अटक केल्याची माहिती मिळताच म्होरक्या फरार झाला.
त्याच्या स्वराज्यनगरातील घरात एक प्रिंटर आणि चार वेगवेगळ्या रंगाच्या बाटल्या, दोन टोनर आढळून आले.तसेच आतापर्यंत किती रूपये छापले आणि ते कोणाला वाटप केले. याची यादीही मिळाल्याची माहिती पोलिस बीडमध्ये बनावट नोटा प्रकाशित केल्यानंतर एक अल्पवयीन व त्याचा भाऊ हे दोघेजण बनावट नोटा घेऊन पुणे, मुंबईला जात असत. तेथे ठराविक लोकांना दोन लाख रूपये देऊन खरे १ लाख रूपये घेऊन यायचे. या बदल्यात त्यांना कमिशनही दिले जात होते. हे पैसे कोणी घेतले ? याचाही शोध पोलिस घेत आहेत.