जत : जत-शेगाव रोडवर रेवनाळ फाट्याजवळील बस थांब्यालगत अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे संकेत शिवाजी बोराडे (वय २२, मूळ रा. शेगाव, सध्या रा. जत) हा जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला. संकेत बोराडे याचे शेगाव येथे
स्पेअर पार्टचे दुकान आहे. तसेच सर्व्हिसिंग सेंटर आहे. सायंकाळी दुकान बंद करून जतकडे घरी दुचाकीवरून येत होता. तेव्हा जत- शेगाव रस्त्यावरील आड या बस थांब्यापासून काही अंतरावर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. धडकेत तो जागीच ठार झाला. अपघात झाला त्यावेळी परिसरात कोणी नव्हते. काही वेळाने हा प्रकार समजला.
त्यानंतर जत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.मृत संकेत याच्या पश्चात आई- वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. – मृत संकेत हा अविवाहित आहे.अपघात कुणीही न पाहिल्याने तर्क- वितर्क केले जात आहेत.