सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., सांगलो कारखान्याची ६७ वार्षिक सर्व साधारण सभा कारखाना स्थळावर खेळीमेळीत पार पडली.यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले की, आज पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनिअरींग कॉलेज बुधगाव या कॉलेजमधून बाहेर पडलेले एक हजार पेक्षा अधिक तरुण इंजिनिअर म्हणून परदेशात नोकरी करुन वार्षिक करोडो रुपयांचा पगार घेत आहेत, तर काहीनों चांगले उद्योग उभारले आहेत.
या बाबींचा विचार करुन व नुसते साखर उत्पादन पुरते मर्यादित न राहता कारखान्याच्या माध्यमातून कारखाना साईटवर हॉस्पिटल व मेडीकल कॉलेज काढण्याचा माझा मानस आहे.जेणेकरुन सभासद शेतकरी व गरजू गरीब लोकांना सवलतीच्या दरात उपचार मिळतील.
खा.पाटील पुढे बोलताना मिळाले की, माझ्या लोकसभा निवडणुकीच्या विजयात सभासद कामगारांचा मोलाचा वाटा आहे, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.
या वर्षापासून सभासदांना देणेत येणारी साखरही दसऱ्यापूर्वी देणार तसेच तोडणी वहातुकदारांकडून शेतकऱ्यांची अडवणुक करुन पैसे घेतल्यास त्याबाबत संबंधितांनी लेखी तक्रार दिल्यास आम्ही ते पैसे त्यांच्या बिलातून कपात करुन शेतकऱ्यांना परत देवू, तसेच परतीच्या ठेवीतून शेअर्स रक्कम घेण्यासही समंती दिली जाईल.
यावेळी लोकसभेवर निवडूण गेल्याने त्याबद्दल सर्व सभासदांतर्फे श्री. मिलींद खाडीलकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला, तर प्रा.डी.ए.पाटील सर यांनी सभासदांतर्फे खासदार विशाल पाटील यांचा सत्कार केला.यावेळो सिकंदर जमादार, उदय पवार, रघुनाथ पाटील कर्नाळकर, सुनिल पाटील जि.प. सदस्य विसापूर, दिलीप वग्यानी आष्टा, शिवसेनेचे बजरंग पाटील, मार्केट कमिटी संचालक शशिकांत नागे, जि.प.सदस्य विशाल चौगुले, कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनिल आवटी च सर्व संचालक उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले त्यास सर्व सभासदांनी एकमतानी मंजुरी दिली. शेवटी आभार संचालक अमित पाटील यांनी आभार मानले.