जान्हवीच्या ‘देवरा’चा ३०० कोटींचा धमाका

0
9

जान्हवी कपूरचा दाक्षिणेकडील पदार्पणाचा चित्रपट असलेल्या ‘देवरा’ ने बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यात यश मिळविले आहे. ज्युनियर एनटीआरसोबतची जान्हवीची जोडी रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. धडाकेबाज अॅक्शन आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या बळावर ‘देवरा’ चित्रपटाने तीन दिवसांमध्ये जागतिक पातळीवर ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हा चित्रपट जान्हवीसाठी जणू दक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रवेशासाठी शुभ शकुन ठरला आहे. वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये रिलीज झालेल्या ‘देवरा’ने जगभरात पहिल्याच दिवशी १७२ कोटी रुपयांचा बिझनेस करत सर्वांचे लक्ष वेधले. सिनेमागृहांतून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रियांचा फायदा ‘देवरा’ चित्रपटाला झाल्याचे मानले जात आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here