मिरज पॅटर्न’चा नेमका जनक कोण?

0
10

मिरज, सांगलीच्या राजकारणात मिरज पॅटर्नचा बराच बोलबाला आहे.या पेंटनने राजकीय मैदानात भल्याभल्यांना पाणी पाजलंय, तसंच सत्तासुंदरीची भेटही घालून दिलीय. या पॅटर्नचा जन्मदाता कोण?’ याचे उत्तर मात्र निश्चित नाही. नवनिर्वाचित आमदार इंदिस नायकवडी यांनी मिरजेतील एका कार्यक्रमात थेट याचे जनकत्व स्वीकारले.

 

“मिरज पॅटर्नचा प्रोड्यूसर मीच, पण लुंग्यासुंग्यांना वाटतं आपणच मालक या शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली. येत्या विधानसभा निवडणुकीत मिरज मतदारसंघाचा किंगमेकर होण्याची महत्त्वाकांक्षा तर नवे आमदार बाळगून नसावेत ना? अशी शंका आता मिरजकरांना येत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here