मनोज जरांगेंनी दंड थोपटले ! | विधानसभेसाठी तीन कलमी कार्यक्रम

0
21
जालना: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जांगे यांनी शेवटी विधानसभा निवडणुकीत (२०२४) उडी घेतली आहे. त्यांनी आज (२० ऑक्टोबर) मराठा समाजासासमोर आपली भूमिका स्पष्ट केली असून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी त्यांनी उमेदवारांना अर्ज भरायला सांगितले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी जरांगे ते यांनी तीन महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. याच तीन मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून जरांगे निवडणूक लढवणार आहेत, विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथं मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे आणि ज्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही तेथील आपल्या विचारांच्या उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर लिहून त्यांना निवडून आणायचं आहे. ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहे त्यांनी भरावे, पण २९ ऑक्टोबरला मी सांगितलेल्या ठिकाणी अर्ज कायम ठेवून निवडणुक लढायची असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जागे पाटील यांनी आज (२० ऑक्टो ऑक्टोबर) अंतरवाली सराटीमध्ये सभा घेऊन केली.जरांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा केल्याने त्याचा फटका कोणाला बसणार? याचे उत्तर २३ नोव्हेंबर रोजी मिळणार आहे.
एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, जिथं निवडून येतील तिथे उमेदवार उभे करणार आहे. एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, आपल्या विचारधारेशी असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं आहे, ज्या ठिकाणी आपण उभा करायचं नाही, तिथे आपण जो ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल त्याला आपण निवडून आणायचे, बाकीचे सर्व पाडायचे असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. ते म्हणाले की, आता आपण सर्व जाती धर्माच लोक उभे करायचे आहेत. कुठे मराठा, दलित मुस्लिम समीकरण जुळते का? याचाही अंदाज घ्यायचा आहे. एका जातीवर सीट निवडून येऊ शकत नाही. समीकरण जुळून येतोय का बघू, तुम्ही फॉर्म भरा, २९ तारखेला ज्याला फॉर्म काढायचा आहे त्यानं काढायचा असेही त्यांनी सांगितले.

विरोधात भूमिका घेणाऱ्यांना पाडणार
मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात बोलताना विधानसभा निवडणुकीची रणनीतीदेखील सांगितली आहे. आपण उमेदवार देत असू तर विजयाचे समीकरण साधावे लागेल. माझे त्यासाठी बोलणे चालू आहे. सोबतच जो आपल्या विरोधात भूमिका घेईल त्याला पाडायचं आहे, असं जरांगी यांनी मराठा सामजाला उद्देशून म्हटलं आहे.
मुस्लीम धर्मगुरी, वकील, राजकीय तज्ज्ञांसोबत बैठका
दरम्यान, जरांगे यांनी ही भूमिका जाहीर करण्याआधी वकील, राजकीय अभ्यासकांसोबत बातचित केली आहे. त्यांनी १९ ऑक्टोबरच्या रात्री मुस्लीम धर्मगुरीची भेट घेत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. मुस्लीम धर्मगुरूंनी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर ते आपली भूमिका जरांगे यांना सांगणार आहेत. त्यामुळे जरांगे यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी नेमके कोणते डावपेच आखले आहेत? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here