संख : संख (ता.जत ) येथील तुकाराम बाबूराव पाटील (५५, रा.पाटील वस्ती, संख) यांच्यावर एकाने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले.कांबळे गल्लीत रात्री हा प्रकार घडला.याप्रकरणी संशयित महेश मल्लाप्पा कांबळे (३२) याच्यावर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर संशयितास उमदी पोलिसांनी अटक केली.त्याला न्यायालय समोर आज हजर करण्यात आले,असता संशयित आरोपीस एका दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुकाराम पाटील हे बुधवारी (दि.१६) सायंकाळी साडेसात वाजता शेतात कामाकरिता नेहमी येणाऱ्या शेतमजूर शिवाबाई कांबळे व अश्विनी कांबळे यांना कामासाठी सांगायला गेले होते.त्यावेळी अश्विनी कांबळे व संशयित महेश कांबळे यांच्यात त्यांच्या घरासमोर वाद सुरू होता. तुकाराम यांनी भांडणाचे कारण विचारल्यानंतर अश्विनी यांनी महेश खूप दिवसापासून त्रास देत असल्याचे सांगितले. महेश कांबळे याने विचारणा करणाऱ्या तुकाराम यांना शिवीगाळ केली. चाकूने त्यांच्या उजव्या गालावर व ओठावर वार केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यात तुकाराम पाटील हे गंभीर जखमी झाले.
त्या अनुषंगाने संशयितास पकडण्यासाठी शनिवारी रात्री पोलीस कॉन्स्टेबल पांढरे, व पोलीस हवालदार बंडगर यांनी सापळा रचला. त्यावेळी आरोपी पोलिसांना बघून पळून जात असताना पाठलाग करून आरोपीला अटक करून कोर्टा समोर हजर केले असता एका दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे.सदर आरोपीला उमदी पोलिसांनी घटनास्थळी चौकशीसाठी आणले होते.
अधिक तपास तपास उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कांबळे करीत आहेत.