महिलांवरील अत्याचारांच्या बातम्या नेहमीच समोर येत असतात. आता महिलांनीही पुरुष साथीदारांवर केलेल्या अत्याचाराच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. पुरुष जोडीदारावर अत्याचार केल्याने ब्रिटनच्या वेल्समधील एका महिलेला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ४१ वर्षीय गॅरेथ जोन्स यांची ही कहाणी असून त्यांच्यासोबत सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनेच त्यांच्यावर हे अत्याचार केले आहेत. जुलै २० २१ मध्ये जोन्स यांची सारा रिग्बी या महिलेसोबत ऑनलाइन मैत्री झाली. मात्र नंतर तिच्या अत्याचारांना कंटाळून त्यांनी अखेर त्यासंबंधी मदत करणाऱ्या ‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’ या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली. ‘मॅनकाइंड इनेशिटीव्ह’ च्या माहितीनुसार, पुरुषांवरील अत्याचार ही काही आता दुर्मिळ बाब राहिलेली नाही.