विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वच पक्षातील नेत्यासह अपक्षाची पळापळ सुरू आहे. तर काहींना अजूनही अधिकृत्त पक्षाकडूम उमेदवारी मिळण्याची प्रतिक्षा आहे. अशा सर्व पेच प्रंसगात फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून थेट जेलमधून एक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातून दिगंबर आगवणे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दिगंबर हे भाजपचे पदाधिकारी होते.
गेल्या ३० महिन्यापासून ते जेलमध्ये आहे. विशेष म्हणजे 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली होती. त्यात त्यांना सुमारे 86 हजार अशी उल्लेखनीय मते मिळाली होती.सध्या आगवणे मनी लॉन्ड्रींग केसमध्ये जेलची हवा खात आहेत. त्यांनी आता जेलमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फलटण इथे आले होते. त्यावेळी त्यांना पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले होते. मात्र ते उमेदवारी अर्ज न भरताच निघून गेले. अर्जा बरोबर आवश्यक कागदपत्र नसल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. त्यानंतर त्यांनी कोर्टाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नव्याने परवानगी मागितली आहे. त्यांना ती मिळाली असल्याचेही समजते. त्यामुळे आगवणे हे जेलमधून निवडणूक रिंगणात असतील. गतवेळी आगवणे यांना जवळपास 30 हजाराच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला होता. आता ते निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यासाठी गुरुवारी पोलिस बंदोबस्तात फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणूक कक्षात आगवणे यांनी एन्ट्री झाली. त्यांनी उमेदवारीसाठी प्रशासनाकडून अर्ज खरेदी केला होता. निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाकडून त्यांनी परवानगीही घेतली आहे. न्यायालयाने अर्ज भरण्यास परवानगी दिल्याने आगवणे हे अर्ज भरण्यासाठी पोलिस बंदोबस्तात फलटण तहसील कार्यालयात आले होते. पण अपूऱ्या कागदपत्रामुळे तो त्यांना भरता आला नाही.
भाजपचे माजी पदाधिकारी असलेल्या दिगंबर आगवणे यांना कर्ज घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून ते कारागृहात आहेत. भाजप नेते दिगंबर रोहिदास आगवणे यांना 11 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रींग प्रकरणातही ईडीने अटक केली होती. आगवणे हे सध्या कारागृहात मकोका खाली बंद आहेत. याशिवाय त्याच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात आणखी 22 गुन्हे दाखल आहेत. विविध कर्ज प्रकरणे, पतसंस्थांची फसवणूक, जमीन घोटाळे, खंडणी, धमकी अशा विविध आरोपांखा