भाजपचे १२१, काँग्रेसचे ८८, ठाकरेंचे ८३ उमेदवार जाहीर
चार पक्षांची दुसरी, तिसरी यादी जाहीर
मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. असे असतानाही विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा दिवस जवळ आल्याने विविध राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याचा धडाका लावला आहे. शनिवारी चार पक्षांनी आपल्या दुसऱ्या व तिसऱ्या उमेदवार याद्या जाहीर केल्या. महाराष्ट्राच्या २८८ सदस्यीय विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक
होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. महायुतीने आतापर्यंत २१४ व महाविकास आघाडीने २२१ उमेदवारांची घोषणा केली आहे.
काँग्रेसची तिसरी यादी जाहीर काँग्रेसने शनिवारी सायंकाळी तिसरी यादी जाहीर
केली आहे. या तिसऱ्या यादीत १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीसह काँग्रेसने आतापर्यंत ८८ उमेदवार जाहीर केले आहेत. बाबा सिद्दिकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार होते. याच मतदारसंघातून काँग्रेसने असिफ झकारिया यांना उमेदवारी दिली आहे. असिफ झकारिया हे दोनवेळा मुंबई पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत.
भुजबळांविरोधात शिंदे मैदानात
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षाच्या दुसऱ्या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रपरिषद घेऊन ही उमेदवारांची नावे जाहीर केली. दुसऱ्या यादीमध्ये बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.
ठाकरेंकडून १८ जणांना संधी
एकूण
शिवसेना (उबाठा) पक्षाने शनिवारी आपली दुसरी व तिसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत १५ तर दुसऱ्यात ३ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघाचा सहभाग आहे.
अनुजा सुनील केदार यांना काँग्रेसचे तिकीट
काँग्रेसने २३ उमेदवारांची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली आहे. सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा सुनील केदार यांना सावनेर मतदार संघातून तिकीट मिळाले आहे. सुनील केदार हे सावनेरमधून काँग्रेसचे आमदार आणि मंत्रीही राहिले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधून गणपतराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आहे. शरद पवार गटाने छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही उमेदवार दिला आहे. येवला मतदारसंघातून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोल्यामधून अमित भांगरे, माळशिरस येथून उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीने ४५ उमेदवारांना संधी दिली होती.
महाआघाडीत ९०चे समान सूत्र
तिन्ही पक्षांना प्रत्येकी ९० तर मित्रपक्षांना १८ जागा
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला शिवसेना नेते संजय राऊत यांनी मविआच्या संयुक्त पत्रपरिषदेत जाहीर केला होता. पण या फॉर्म्युल्यानुसार जागा वाटपांचा घोळ झाल्याचे दिसून आले, त्यानंतर शुक्रवारी काँग्रेस नेते बाळासाहेबत थोरात यांनी ९०-९०-९० असा नवीन फॉर्म्युला जाहीर केला आहे. तसेच हा नवा फॉर्म्युला देखील बदलू शकतो असे संकेतही दिले. थोरात म्हणाले, महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांमध्ये मोठा भाऊ किंवा धाकटा भाऊ असणार नाही. उलट सर्व पक्ष समान असतील. आघाडीत ठरलेल्या नव्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना ९०-९०-९० जागा मिळतील. तर उर्वरित १८ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत.दिल्लीत खलबतं
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शुक्रवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, रखडलेल्या जागांबाबत आम्ही चर्चा करत आहोत. आमचे जे उमेदवार सक्षम आहेत त्यांच्या नावावर चर्चा झाली असून सीईसीपुढे ही नाव आम्ही ठेवू. मैत्रीपूर्ण लढत आम्ही कुठेही करणार नाही. आमच्यामध्ये नाराजी आहे असे काही नाही. राज्याची निवडणूक आहे, त्यामुळं काही अडचणी असतात त्या आम्ही सोडवत असतो. २८८ पैकी १८ जागा आम्ही मित्रपक्षांना ठेवल्या आहेत. त्यातून किती सुटतील बघू, आमचा ८५-८५-८५ चा फॉर्म्युला आता ९०-९०-९० झाला आहे. तो आता १०० च्या पुढे जाणार का? याची अजून बेरीज केली नाही. लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल.
काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती
महाविकास आघाडीने आतापर्यंत १५८ जागांवरील उमेदवार जाहीर केले. यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या ४५, ठाकरे गटाच्या ६५ व काँग्रेसच्या ४८ उमेदवारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीत ५ ते ७ जागांवरील तिढा सुटत नसल्याने तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता जागावाटपाचा फॉर्म्युला पुन्हा एकदा बदलू शकतो आणि तो सुरुवातीला जाहीर केला त्याप्रमाणे समसमान असणार की कमी-जास्त प्रमाणात असणार हे पाहावे लागणार आहे.
इतर मित्रपक्ष उद्धव यांच्या वृत्तीवर काँग्रेस नाराज
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते उद्धव यांच्या वृत्तीवर नाराज आहेत. काही जागांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान उद्धव यांच्या पक्षाने आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केल्याचे वृत्त आहे. उद्धव हे युती धर्माचे पालन करत नसल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
काही जागांवर एकमत नाही
सर्व प्रयत्न करूनही काँग्रेस आणि उबाठा काही जागांवर सहमती मिळवू शकले नाहीत. रामटेक जागेबाबत काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक हेही या जागेवरून लढवण्याच्या तयारीत होते. मात्र उबाठा पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या आशा मावळल्या आहेत.