पुन्हा एकदा सजेल मानवतेचा समागम | 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीचे सौंदर्य 

0
132

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निरंकारी परिवाराचा 77वा वार्षिक संत समागम 16, 17 व 18 नोव्हेंबर, 2024 ला आयोजित होत आहे. आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांति आणि एकत्वाचा संदेश दिला जातो जो नि:संदेह समस्त मानवतेच्या कल्याणार्थ असतो. सर्वविदित आहे, की या संत समागमाची भव्यता ही केवळ त्याच्या क्षेत्रफळाने अधोरेखित होत नाही, तर त्याचे इंगित याठिकाणी देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्तगणांच्या भावनेमध्ये साठलेले आहे. निरंकारी संत समागम मानवतेचा असा एक दिव्य संगम असतो जिथे धर्म, जात, भाषा, प्रांत तसेच गरीब-श्रीमंत आदि बंधनांच्या पलीकडे जाऊन सकळजन मर्यादेत राहून प्रेम आणि सौहार्दपूर्ण भावाने सेवा, सिमरण आणि सत्संग करतात.

हे त्याच संदेशाचे अनुसरण आहे जो समस्त संतांनी, गुरु-पीरांनी वेळोवेळी दिलेला आहे. या तीन दिवसीय संत समागमामध्ये भक्तिच्या अनेक पैलुंवर  गीत, विचार आणि कविता आदि माध्यमातून भक्तगण आपले शुभभाव प्रकट करतील. सतगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रवचनरुपी अमूल्य उपहाराचादेखील सर्वांना लाभ होणार आहे. यावर्षी सतगुरु माताजींनी समागमाचा विषय दिलेला आहे.थोड्याच दिवसांत हे आध्यात्मिक स्थळ ‘भक्तीच्या नगरी’चे रूप धारण करेल जिथे जगभरातून लाखोंच्या संख्येने भक्तगण येऊन सहभागी होतील.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here