कॉंग्रेसच्या पारपांरिक मतदार ‌संघात तीनवेळा भाजपाचा‌ विजय

0
1606

महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात शेवटचा तालुका, कायम अवर्षणग्रस्त परंतु संवेदनशील अशी तालुक्याची ओळख आहे. राजकीय पटलावरील पार्श्वभूमी पाहता परिवर्तनाची दिशा, जिल्ह्याच्या राजकारणाला वळण देणारी दिशा पाथ जत तालुक्यातून मिळते, हा इतिहास आहे.

विधानसभा निवडणूक असो, लोकसभा निवडणूक असो, जिल्हा बँक, सांगली मार्केट कमिटी, जिल्हा परिषद निवडणूक या स्थानिक स्वराज्य संस्थेवर महत्त्वाची भूमिका व बर्चस्व जत तालुक्याचे असते. विशेषतः गेमचेंजर म्हणून ओळख आहे. यात अनेक मातब्बरांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. कॅबिनेट कामगार मंत्री सुरेश खाडे यांना २००४ साली जत तालुक्याने विधानसभेत संधी दिली होती. आज ते मिरजेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सलग ४२ बर्षे आमदार संघ राखीव होता. २००९ नंतर मतदारसंघ खुला झाल्यानंतर चुरशीच्या लढती होत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका इङ्गल्या. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एकूण २६४ पैकी २१५ जिंकल्या होत्या. यात सुरुवातीस खुल्या असणाऱ्या जत मतदारसंघातून मूळचे तासगाव तालुक्यातील पेड या गावचे असणारे बरिस्टर टी. के. शेंडगे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे शिवाजी शेडबाळे यांचा ५० टके मताच्या फरकाने पराभव केला होता. जत तालुक्यात धनगर समाजाचे प्राबल्य असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवली होती.

सलग ६ वेळा काँग्रेस विजयी, १९९५ ला ब्रेक.

१९६७ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघ अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव झाला होता. या मतदारसंघात काँग्रेसचे सलग सहा वेळा म्हणजेच १९६७ ते १९९० या कालावधीत बर्चस्व होते. मात्र १९९५ च्या निवडणुकीत विलासराव जगताप श्रीमंत डफळे सरकार अन्य काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी एकत्रित येऊन मधुकर कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली.यात सामान्य कुटुंबातील २९ वर्षीय मधुकर कांबळे या टी. के. शेंडगे अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. १९८५, १९९० च्या निवडणुकीत सलग २ वेळा विजयी असलेल्या काँग्रेसच्या उत्कालीन स्वर्गीय आमदार उमाजीराव सनमडीकर यांचा आश्चर्यचिकितरित्या पराभव झाला होता.

१९९९ ला पुन्हा काँग्रेसची सरशी, सनमडीकर विजयी.

१९९५ च्या पराभवानंतर फक्त नमस्कार पर जत तालुक्यातील जनता मते देऊन निवडून देतात, असे जाहीर सभेत सांगणाऱ्या माजी आमदार सनमडीकर यांनी १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा कमबॅक केले. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे सीताराम व्ानखंडे यांचा ५० टक्के मताने पराभव केला. तसेच विद्यमान आमदार असलेल्या मधुकर कांबळे यांना तिसऱ्या क्रमांकावर राहाचे लागले, तर २ वेळा आमदार असणाऱ्या शिवरुद्र ठक्जीराव बामणे यांना १९७८ नंतर दुसऱ्यांदा पराभव स्वीकारत ७ व्या क्रमांकावर राहावे लागले. त्यांना केवळ या १९९९ च्या निवडणुकीत केवळ ५८१ मते मिळाली होती. बालेकिल्ल्याला सुरुंग २००४ च्या निवडणुकीत भाजपचे नेते विलासराव जगताप यांनी नाराज गटांना एकत्रित करत, सनमडीकर यांच्यावरील नाराजीचा फायदा घेत सुरेश खाडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यात खाडे यांना ६३ हजार ५९ मते मिळाले. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार उमजीराव सनमडीकर यांचा २५ हजार ४४९ मताच्या फरकानी पराभव केला.

अन् पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलवले. रिपाईच्या माध्यमातून कार्यरत असणारे सुरेश खाडे यांनी १९९९ च्या निवडणुकीत ८ हजार ५६ इतकी मते मिळवली होती. खाडे यांच्या विजयाच्या किनाऱ्याला १९९९ ची पार्श्वभूमी व जगताप यांची राजकीय व्यूहरचना कारणीभूत होती. २००९ काँग्रेस विसर्जित, भाजपच्या प्रकाश शेंडगे यांना साथ १९६७ नंतर तब्बल ४२ वर्षांनंतर जत मतदारसंघ खुला झाला. त्यामुळे इच्छुकांची गर्दी वाढली होती. जत तालुक्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून भूमिका असलेले विलासराव जगताप यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली, मात्र काँग्रेसने आघाडीचा धर्म न पाळता बेट माजी मंत्री स्व. शिवाजीराव शेंडगे यांचे पुत्र असलेल्या प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला. अन् अवध्या २१ दिवसांत जत तालुक्यात आलेल्या प्रकाश शेंडगे यांनी संघर्षमय असलेल्या जगतापांचा ४ हजार ६६७ मतांनी पराभव केला. ज्यांनी पहिल्यांदा कमळ फुलवले. त्याच जगतापाना भाजपकडूनच पराभवाची धूळ चाखावी लागली होती.

खुल्या प्रवर्गानंतर विद्यमान

आमदारांना दुसऱ्यांचा संधी नाही. २००९ च्या निवडणुकीत प्रकाश शेंडगे यांनी बाजी मारली. परंतु २०१४ च्या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांनी १७ हजार १९८ मतांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत बिद्यमान आमदार विलासराव जगताप यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांनी २५ हजार ६७४ इतक्या मतांच्या फरकाने पराभव केला होता. एकंदरीत २००९ नंतर दुसन्यांदा संधी जत तालुक्यातील मतदार आणि आजतगायत दिली नाही, हे मात्र विशेषच.

जतला बंडखोरीचा इतिहास, बंडखोरी कधी भाजपाच्या पथ्यावर

माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांना थेट आव्हान देत्त निकटवर्तीय असलेले (मूळचे काँग्रेसचे) प्रभाकर सनमडीकर यांनी जनस्वराज्य पक्षाच्या तिकिटावर २००४ च्या निवडणुकीत रिंगणात उतरले, यात २५ हजार ५४१ इतकी मते घेतली. यात माजी आमदार सनमडीकर यांच्या २५ हजार ४४९ मतांनी पराभव झाला होता. सनमडीकर यांचा पुतण्या प्रभाकर सनमडीकर यांच्यामुळे पराभव झाला होता.

२०१९ च्या निवडणुकीतही तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांच्या उमेदवाराला विरोध करत बंडाचा निशाणा डॉ. रवींद्र आरळी यांच्या माध्यमातून भाजपमधील नाराज गटाने साधला होता. त्यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली होती.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here