आजही समाजात विकृत्ती कमी होत नसल्याचे चित्र आहे.एकीकडे अंधश्रद्धे विरोध सरकार जागृत्ती करत असतानाही अनेक बुवाबाजीच्या भूलथापांना बळी पडत आहेत.मूल होत नसल्यामुळे बुवाबाजीच्या थापांना बळी पडून विवाहितेच्या सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तसेच शुद्धिकरणाच्या नावाखाली पती, दीर आणि अर्जुनवाड (ता.शिरोळ) येथील भोंदूबुवासह तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, पती, दीर आणि बुवा काशीनाथ रामा उगारे (वय ४०, रा. अर्जुनवाड, ता.शिरोळ) याला अटक केली आहे.आजही अंधश्रध्देला बळी पडणारी संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.
पंढरपूर परिसरातील तरुणीचा सांगलीतील विश्रामबाग परिसरातील सुशिक्षित कुटुंबातील तरुणाशी विवाह झाला आहे.विवाहानंतर मूल होत नसल्यामुळे तरुणीचा छळ होऊ लागला.मुल व्हावे म्हणून कुटुंब अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते.त्यामुळे घरात सतत बुवा,महाराज यांना आणले जात होते. बुवाचे पाय धुऊन पाणी प्यायला लावले जात होते. मूल होत नाही म्हणून तरुणीचा पती, दीर, सासू, सासरे हे त्रास करत होते.विश्रामबाग येथील घरी तसेच अर्जुनवाड गावातील मंदिरात तिचा छळ केला.काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणीची सासरची मंडळी जात होती.
तेव्हा वाटेत मोटार बंद पडली.त्यांनी अर्जुनवाड येथील बुवा काशीनाथ उगारे याला मोबाइलवरून कॉल केला. त्याला हकिगत सांगितली.त्याने मी उपाय करून देतो म्हणून शुद्धिकरणाच्या नावाखाली अनेक धार्मिक विधी केले.त्यानंतर पती, दीर व भोंदूबुवा यांने अत्याचार केला.त्यानंतर पत्नी माहेरी गेली.अनेक दिवस ती नैराश्यात असल्याने आईने तीला वारवांर विचारणा केल्यानंतर हा प्रकार तीने आईला सांगितला.
धक्का बसलेल्या माहेरच्या मंडळीने विश्रामबाग पोलीसात धाव घेत तिघाविरोधात फिर्याद दिली.संशयित तिघांवर पोलीसांनी सामुहिक बलात्कार,जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गंत गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतले आहे.