मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार किंवा राजकीय नेत्यांकडून महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध केलेले अपमानास्पद वक्तव्ये तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करणारी कृती आढळल्यास त्यावर वेळीच कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी दिले.
उर्वरित १५ दिवसांमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जवाबदारीने कार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार व कुमार यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली.
खाजगी जीवनावर टीका-टिप्पणी नको राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध कोणतीही कृती, सहभाग किंवा वक्तव्यांपासून दूर राहावे. तसेच, इतर पक्षांच्या नेते किवा कार्यकर्त्यांच्या खाजगी जीवनाशी संबंधित कोणताही मुद्दा, जो त्यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नाही, त्यावर टीका करू नये.
प्रतिस्पर्ध्याचा अपमान करण्यासाठी ELECTION COMMISSION OF ADA खालच्या पातळीवरील वैयक्तिक हल्ले टाळावेत, अशा सूचना राजीव कुमार यांनी केल्या. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान सर्व उमेदवार आणि पक्षनेते महिलांच्या सन्मानाशी संबंधित भाषा आणि वर्तन उंचावतील तसेच महिलांच्या सन्मानाशी सुसंगत वर्तणूक करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.