तानाजी म्हणाला, “नेताजी आम्हाला सुरक्षित राहायचे आहे एकदम सेफ… सांगा यासाठी काय करावे लागेल? कुठला एखादा चांगला उपाय सांगा.” नेताजी महणाले, “तानाजी श्रीमंत लोक आपल्या बंगल्याची वॉल कम्पाउंड उंच करतात व त्याला काटेरी तार लावतात. आतला बाहेर जायला नको अन् बाहेरचा आत यायला नको. गेटवर गार्ड असतात व कुण्या अनोळखी व्यक्तीला ते भटकू देत नाहीत. जर कुणी फार आग्रहच केला तर गार्ड बंगला मालकाला किंवा मालकिणीला फोन करून अमुक तमुक व्यक्ती आला आहे, भेटू इच्छितो असे सांगतात. आतून मग येऊ द्या असे सांगितले तर संबंधिताला गार्ड आत सोडतो अन्यथा बाहेरूनच त्याला आल्या पावली रवाना करतो.
नेत्यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली जाते. तरी पण त्यांचा धोका कमी होत नाही. सुरक्षा असूनही एगसीपी नेते बाबा सिद्दीकी यांना याना गोळया मातल्या.” तानाजी यहणाला, “नेताजी आम्ही व्हीआयपी सुरक्षेवर बोलत नाही. सामान्य माणसाच्या सुरक्षेवर बोलत आहोत. सामान्य माणसाला कीआयपी बंगल्यावर असणाऱ्या कुत्र्यांपासून धोका असतो अन् रस्त्यावर पायी चालताना मोकाट कुत्र्यांपासूनसुद्धा धोकाव असतो. त्याच्या सुरक्षेविषयी बोला. जुन्या काटी सामान्य लोक घराचे मुख्य दार मजबूत बनवीत होते. ते कुणाला सहजासहजी तोडता येत नव्हते. घरात भाला, लाठी ठेवायचे. आपले कुटुंबव आपण सेफ असावे असे त्यांना वाटायचे. कुणी मदतीसाठी कुत्रे पाळायचे, गार्ड वगैरे ठेवण्याएवढी त्यांची श्रीमंती नव्हती. अमेरिकेत तर लोक आपल्या परी गन ठेवतात.
तेथे अनीळखीला घरात प्रवेश नसती, पोस्टमन दाराजवळ पार्सल ठेवून दूर जातो आणि मग घरमालक हळूच दार उघडतात व पार्सल उचलून आत नेतात. दार पुन्हा बंद करतात. निवडणूक प्रचारात ट्रम्प यांच्यावर गोळी चालली, जी त्यांच्या कानाला चाटून गेली होती. नशीय बलवत्तर ट्रम्प तात्या बचाकडे आता एवढ्या सुरक्षेत ट्रम्प सुरक्षित राहिले नाहीत.” नेताजी म्हणाले, “तानाजी कधी सुरक्षासुद्धा कामी येत नाही. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या, काय झालं? कुंपणाने शेत खाल, सुरक्षा रक्षकांनीच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांच्यावर इंदिरा गांधींचा विधास होता. शेवटी घात झाला तो झाला.
सामान्य माणसाला गर्दीच्या ठिकाणी रस्ता पार करावा लागतो. फुटपाथवर अतिक्रमण केलं जाते मग सामान्य पादचारी कसा चालणार? त्याला सडकेवरून चालावे लागते. महिलांची तरी सुरक्षा आहे काय? भामटे त्यांचे मंगळसूत्र उडवून पसार होतात. डॉक्टरकडे गेलो तर ते म्हणतात, हेपेटायटिस, टायफाईड व न्यूमोनियाचे व्हॅक्सिन लावा तर सेफ राहाल. शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड काहीपण होऊ शकते तेव्हा पॅथॉलॉजिकल तपासणी करा. देशाच्या राजधानीची हवा विषारी झाली आहे. तेव्हा नेते तरी दिल्लीत सेफ आहेत काय?”