ज्यांना काका म्हटले त्या ‘काका’नेच विवाहितेचा खून

0
154

पती बाहेरगावी गेलेला असताना त्याच्या पत्नीचा खून करून मृतदेह घरातील पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.८) उघडकीस आला होता. या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्वप्नाली उमेश पवार (२४, रा.हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) असे मृत महिलेचे नाव आहे.पवार दाम्पत्याच्या घरी नेहमी येणाऱ्या व्यक्तीने (ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे) हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत तिचा पती उमेश पवार (३६, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.उमेश पवार हे उबेर टॅक्सीचालक आहेत. त्यांना बीड जिल्ह्यातील केज येथील भाडे लागल्याने ते ७ नोव्हेंबर रोजी रात्री गाडी घेऊन गेले होते. भाडे सोडून सकाळी ते परत घरी आले तेव्हा त्यांना घराला बाहेरून कडी लावलेली दिसली. घरात त्यांची पत्नी नव्हती.

त्यांनी परिसरात शोध घेतला तरी ती आढळून आली नाही. घरातील दागिने,पैसे व तिचा मोबाइलही दिसून आला नाही. तेव्हा त्यांनी पलंगाच्या बॉक्समध्ये दागिने व सोने आहेत का? हे पाहण्यासाठी पलंग उघडला, तेव्हा आत स्वप्नालीचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात स्वप्नालीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला असता त्यांच्याकडे नेहमी येणारा ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे, तो येऊन गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिस त्या ‘काका’चा शोध घेत असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here