मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे मतदान पार पडताच राज्यातील 288 जागांसाठी एक्झिट पोलचा कौल समोर आला असून त्यांच्या अंदाजानुसा राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येतानाचे दिसत आहे.गेल्या काही महिन्यात प्रचारात,प्रचंड आरोप प्रत्यारोप,टोकाचे संघर्ष झाल्यानंतर आज उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे.
आत निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.मात्र तत्पुर्वी मतदारांचा कौल कुणाला ? याचा अंदाज करणारे अनेक टिव्ही चैनल,एंजन्सीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यानुसार राज्यातील महायुती की महाविकास आघाडी.राज्यात कुणाचं सरकार येईल ? याबाबत एक्झिट पोल नुसार अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चाणक्य स्टेटसच्या पोलनुसार राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.यामध्ये भाजप 90+, शिवसेना शिंदे गट 48 +, अजित पवार गट 22+ अशा जागा विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा मिळतील असे चाणक्याने स्पष्ट केले आहे.यामध्ये काँग्रेस ६०+, ठाकरे 35+, प्लस शरद पवार गट आणि इतरांच्या पारड्यात आठ टक्के जागा टाकल्या आहेत.
मॅट्रिझनच्या अंदाजानुसार भाजपला यंदाच्या सर्वाधिक जागा मिळण्याचा शक्यता वर्तवली आहे.यात महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्ता स्थापन करेल अशी शक्यता व्यक्त केली आहे.यात भाजपला 79 ते 101 जागा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसला 39 ते 47 जागा, शिवसेना शिंदे गटाला 37 ते 45 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 35 ते 43 जागा, शिवसेना शिंदे गटाला 21 ते 29 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 17 ते 26 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
मेघ अपडेटच्या एक्झिट पोलनुसार भाजप महायुतीला 150 ते 170 जागा निवडणूक निकालात मिळतील. तर काँग्रेस सह माविकास आघाडीला 110 ते 130 जागांपर्यंत मजल मारता येईल आणि यासोबत अपक्ष आणि इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे महाविकास आघाडीचे स्वप्न सत्यात उतरत नसल्याचे चित्र एक्जिट पोलमध्ये दिसत नाही.