सांगली जिल्ह्यात सरासरी 72.12 टक्के मतदान

0
123

सांगली, दि. 21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी सांगली जिल्ह्यात सरासरी 72.12 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झाले. विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे. 281-मिरज – 66.07 टक्के, 282-सांगली – 62.78 टक्के, 283-इस्लामपूर – 74.71 टक्के, 284-शिराळा – 78.57 टक्के, 285-पलूस-कडेगाव – 79.02 टक्के, 286-खानापूर – 71.27 टक्के, 287-तासगाव-कवठेमहांकाळ – 74.99 टक्के व 288 जत  विधानसभा मतदारसंघात 72.38 टक्के इतके मतदान झाले.

मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. यासाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार संख्या व झालेल्या मतदानाची आकडेवारी 

अ.क्र.विधानसभा मतदारसंघाचे नावएकूण मतदारझालेले मतदानमतदानाची टक्केवारी
  पुरूषस्त्रीइतरएकूणपुरूषस्त्रीइतरएकूणएकूण
२८१-मिरज (अ.जा.)१७१६४६१७२१९८३२३४३८७६११६५१५११०६६११३२२७१८९६६.०७
२८२-सांगली१७७६९३१७८६४२७५३५६४१०११३३८८११०३५८२४२२३७७०६२.७८
२८३-इस्लामपूर१४१६९८१३९१५२२८०८५६१०८०९२१०१७४३२०९८३९७४.७१
२८४-शिराळा१५६१४०१५०८६९३०७०१२१२४४७४११६७३६२४१२१३७८.५७
२८५-पलूस-कडेगाव१४६०७२१४६७८६२९२८६६११८१६५११३२५४२३१४२३७९.०२
२८६-खानापूर१७७५४२१७३४३५१९३५०९९६१२७८५२१२२२९४१४२५०१६०७१.२७
२८७-तासगाव-कवठेमहांकाळ१५९०७६१५३६०६३१२६८६१२१८८४११२६०४२३४४९०७४.९९
२८८-जत१५२४०९१३८९५१२९१३६३१११७८०९९११९२१०९००७२.३८
            एकूण१२८२२७६१२५३६३९१५०२५३६०६५९४२१५०८८६७६९६५१८२८९८४७२.१२
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here