जत तालुक्यात 6 टक्के मतदान वाढले,तब्बल इतक्या मतदारांनी केले मतदान

0
338

जत : जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या जत विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीने ७२.३८ टक्के मतदान झाले.यंदा तब्बल 2,10,900 मतदारांनी मतदानाचा‌ हक्क बजावला.जत शहर आणि पांडोझरी येथील किरकोळ वादावादीचा प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले.अनेक गावात सायंकाळी सात साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

गेल्यावेळी ६४ टक्के मतदान झाले होते, यावेळी मात्र मतदारांची वाढलेली संख्या आणि निवडणुकीतील चुरशीमुळे मतांची टक्केवारी देखिल वाढली आहे. मतदानाची प्रक्रीया पार पडताच, विजयाच्या पैजा लागल्या असून, भाजप, काँग्रेस समर्थकांनी मोठ्या विजयाचा दावा केला आहे.

राज्यातील शेवटच्या जत २८८ मतदारसंघासाठी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून चुरशीने मतदान झाले आहे. येथे अकरा उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही महायुतीचे आ. गोपीचंद पडळकर, महाविकास आघाडीचे आ. विक्रम सावंत, स्वाभीमानी आघाडीचे तम्मणगौडा रविपाटील यांच्यातच झाली. भूमीपूत्र विरूध्द विकासपूत्र आणि जातीयवादाचा मुद्दा यावरून जतचे मैदान चांगलेच गाजले.या साऱ्या घडामोडींचा परिणाम मतदानातून देखिल दिसून आला आहे.

तालुक्यात एकूण २८७ बुथ आणि दोन लाख ९१ हजार ३६३ इतके मतदान होते. सकाळी सात वाजता मतदानाची प्रक्रीया सुरू झाल्यानंतर नऊ वाजेपर्यंत ४.९५ टक्के मतदान झाले. त्यानंतर अकरा वाजेपर्यंत १६.५२ टक्के, एक वाजेपर्यंत ३०.७८ टक्के, तीन वाजपेर्यंत ४५.९३ टक्के तर पाच वाजेपर्यंत ६२.०८ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन पर्यंत धिम्म्या गतीने असणारे मतदान तीन नंतर मात्र चांगलेच वाढले. अनेक बुथवर रात्री साडे सात आठ वाजेपर्यंत वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रीया सुरू होती.

विकासच्या मुद्यांवर लढलो : विक्रम सावंत

मतदानानंतर आ. विक्रम सावंत म्हणाले, ही निवडणुक आपण विकासाच्या मुद्यावर लढलो. मतदारांनीही विकासाला साथ दिली आहे, जातीपातीचं राजकारण जत तालुक्यात होत नाही, हे मतदारांनी दाखवून दिले आहे. विकासाचा दुसरा अध्याय सुरू करण्यास मतदारांनी पसंती दिल्याचे चित्र आहे.

विकासाच्या प्रश्नाला जतकरांची साथ :आ. गोपीचंद पडळकर

 

मी विकासाच्या मुदक्ष्यावर जतमध्ये लढलो, विरोधकांनी त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु जातीयतेला मूठमाती देत मतदारांनी ही निवडणुक पहील्यापासूनच हातात घेतली होती. मतदारांचा उत्साह पाहता, इथे परिवर्तन हवे. त्यामुळे आपला विजय निश्वित्त आहे.

स्वाभीमानाची लढाई लढलो : तम्मणगौडा रविपाटील अपक्ष उमेदवार

तम्मणगौडा रपिपाटील म्हणाले, माझ्याविरोधात दोन आमदार धनशक्तीच्या बळावर लढले. पण आपण स्वाभीमानी भूमीपूत्र म्हणून माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढत दिली आहे. लोकांनी चांगली साथ मला दिली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here