राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? कोण पात्र आणि कोण अपात्र ? याचा फैसला सुप्रिम कोर्टात अद्याप प्रलंबित असला तरी खरा राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष अजित पवार यांचाच असल्याचे राज्यातील मतदारांनी शनिवारी शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला
महायुतीमध्ये २८८ पैकी ५१ जागा मिळाल्या होत्या. यापैकी ४० मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळाला. महायुतीमध्ये सर्वात कमी जागा अजित पवार यांना मिळाल्या होत्या. तरीही त्यांनी आतापर्यंत 41 जागांवर विजय मिळविला आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला केवळ १५ जागा मिळाल्या आहेत.
शरद पवार गटाने ८६ जागांवर निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा दणदणीत पराभव झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपाप्रणीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आतापर्यंत केवळ १० जागांवर विजय मिळविला आहे.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचा गट तब्बल ४० मतदारसंघात आमनेसामने आले होते. त्यामुळे मतदार शरद पवारांची तुतारी फुंकणार की अजित पवारांच्या घड्याळाची वेळ साधणार? असा प्रश्न निर्माण झाला.
होता. मात्र या संघर्षात अजित पवार गटाची सरशी झालेली दिसून येत आहे. अजित पवार यांनीही महायुतीच्या पत्रकार परिषदेत आमचाच पक्ष खरा असल्याचे ठासून सांगितले होते.
राज्यातील मतदारांनी केले शिक्कामोर्तब