खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच

0
135

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. त्यांच्या पक्षाने राज्यात ५७ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा पक्षाला महायुतीच्या जागावाटपात ८५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी ५७ जागांवर शिंदेंचे शिलेदार जिंकले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की त्यांच्याबरोबर बंड करणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा निवडून आणणार. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा शब्द राखला आहे. त्यांच्याबरोबर गेलेले जवळपास सर्वच आमदार (सदा सरवणकर वगळता) विजयी झाले आहेत. विधानसभेत ५० आमदारांपैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन असे विधान शिंदे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाची उद्धव ठाकरे यांच्या पक्षच्या नेत्यांनी खिल्लीही उडविली होती.

मात्र, शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखविला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या एकत्रित जागांपेक्षाही शिवसेनेने अधिक जागा मिळविल्या आहेत. या निवडणुकीत दमदार यश मिळविलेल्या शिवसेनेचे शिंदे जवळपास सर्व विद्यमान मंत्री निवडून आले आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here