आता भष्ट्राचार करणाऱ्या इशारा,सुधारणा करा,अन्यथा…

0
516
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: a; hw-remosaic: 0; touch: (0.14537036, 0.14537036); modeInfo: ; sceneMode: Hdr; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 204.3028; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;

जत : जतच्या विकासाचे स्वप्न घेवून आम्ही जतला आलो.विरोधकांनी भूमिपुत्र म्हणून हिणवले, खालच्या पातळीवर जावून टीका केली, पण जतकरांनी विकासपूत्र म्हणत आम्हाला जे भरभरून प्रेम दिले ते पडळकर बंधू कधीच विसरणार नाहीत.मी जतकरांचे मनापासून आभार मानतो,आम्ही आता कुणालाही शत्रू मानत नाही,जतच्या विकासाला आता आमचे प्राधान्य असेल असे उद्गार माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत काढले.

आ.गोपीचंद पडळकर जतकरांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. जतचा विकासपूत्र १०० टक्के विकास करणार असून जतमध्ये नव्या विकास पर्वाला प्रारंभ झाल्याची ग्वाही ब्रह्मानंद पडळकर यांनी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, परशुराम मोरे, राजू यादव, आण्णा भिसे, विक्रम ताड, किरणमामा शिदे, संतोष मोटे,रवींद्र मानवर, सद्दाम अत्तार, मारुती सरगर, हेमंत चौगुले आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या काळात विरोधकांनी टीका केली पण आम्ही विरोधकांनाही सन्मान दिला. दुष्काळ हाच आमचा विरोधक व शत्रू असल्याचे सांगत ब्रह्मानंद पडळकर म्हणाले, जतकरांना अभिमान वाटेल असे काम करू.

जतचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात करू, विकासकामे करताना सर्वांना समान न्याय दिला जाईल, जतचा विकास करण्याची तसेच भ्रष्टाचार मोडून काढण्याची जबाबदारी आमची आहे, जत तालुक्यातील प्रत्येक बांधावर पाणी पोहचले पाहिजे, रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, सर्वसमान्यांना न्याय मिळाला पाहिजे तसेच जत तालुक्याचा चेहरामोहरा बदलला पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही पडळकर यांनी यावेळी दिली.२०१४ च्या निवडणुकीत ३४ हजाराहून अधिक मतांनी विक्रमसिंह सावंत हे विजयी झाले.

विलासराव जगताप यांचा त्यांनी एकतर्फी पराभव केला. सावंत यांना तेव्हा मताधिक्य मिळाले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली व आता पराभव झाल्यावर मशीनकडे बोट दाखवणे बरोबर नसल्याचे सांगत ब्रह्मानंद पडळकर यांनी सावंत यांचा समाचार घेत त्यांचा मुद्दा खोडून काढला.

सरदार पाटील म्हणाले,आ.गोपीचंद पडळकर यांनी विकासाचा अजेंडा हात्ती घेतला व जतकरांनी त्यांना भरभरून साथ देत नवा इतिहास घडविला आहे. विरोधकांनी विरोध न करता विकासाला साथ द्यावी,जतला नक्की मंत्रिपद मिळेल व जतचा चौफेर विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला.

सुनिल पवार म्हणाले, जतकरांनी आ. गोपीचंद पडळकर यांना विजयी केलेले असताना विक्रमसिंह सावंत यांनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त करत लोकशाहीचा, जनमताचा अपमान केला आहे. निवडणूक संपली आहे आता विरोध करत बसण्यापेक्षा सक्षम विरोधक बनून जतमध्ये काम करा, असा टोला लगावत सुनील पवार यांनी विक्रमसिंह सावंत यांनी पराभवाचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला दिला.

जत येथील पत्रकार बैठकीत माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर,सरदार पाटील,सुनिल पवार आदी 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here