सांगोला : शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला केला. ही घटना शुक्रवारी, दुपारी २ च्या सुमारास शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर घडली.
सागर पाटील हे त्यांच्या कारमधून मिरज रेल्वे गेटशेजारील शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कार्यालयासमोर उभा असलेल्या गाडीच्या पाठीमागील काचेवर अज्ञात २५ वर्षीय तरुणाने दगडफेक करून मिरज रेल्वे गेटच्या दिशेने पळून गेला.