Fact Check : संभल हिंसाचाराशी संबध जोडलेला जळत्या गोदामाचा व्हिडिओ महाराष्ट्राच्या भिवंडीतील आहे; नेमके काय होतयं पोस्टमधून व्हायरल

0
85

Created By: Vishvas News
Translated By: ऑनलाइन संकेत टाइम्स

दावा: जळत्या गोदामासमोर अजान देणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडिओ हिंसाचाराचे लक्षण आहे.

उत्तर प्रदेशातील संभलमधील हिंसाचाराचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  यातील एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जळत्या गोदामासमोर अजान देताना दिसत आहे.  काही यूजर्स या व्हिडिओला संभलमधील हिंसाचाराशी जोडून शेअर करत आहेत.

तपासादरम्यान, आम्हाला एका YouTube चॅनेलवर असाच एक व्हिडिओ आढळला.

व्हायरल पोस्टची तपासणी करण्यासाठी, आम्ही Google Lens सह या क्लिपचे स्क्रीनग्राब शोधले.  22 नोव्हेंबरला असाच एक व्हिडिओ हुसेन अन्सारी नावाच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळाला.  यामध्ये दाखवलेले लोकेशन व्हायरल व्हिडिओच्या लोकेशनशी जुळते.  महाराष्ट्रातील फातिमा नगर येथील 100 फूट रोडवर लागलेल्या आगीच्या घटनेचा व्हिडिओ असल्याची माहिती देण्यात आली आहे.


हा व्हिडिओ फातिमा नगर हंड्रेड फूट रोडचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

या आधारे कीवर्डसह शोध घेतला असता, न्यूज 14 भिवंडी या यूट्यूब चॅनलवर या घटनेशी संबंधित व्हिडिओ देखील आढळून आला.  यामध्ये देखील व्हायरल लोकेशन सारखे लोकेशन बघायला मिळते.  भिवंडीतील फातिमा नगर येथील एका भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे.

‘न्यूज 14 भिवंडी’च्या यूट्यूब चॅनलवरही ही घटना भिवंडीतील असल्याचे सांगण्यात आले.

व्हॉईस न्यूजच्या इंस्टाग्राम अकाऊंटने असेही म्हटले आहे की ते भिवंडी, महाराष्ट्रातील आहे. 22 नोव्हेंबर रोजी the_voicenews च्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अजान देणाऱ्या व्यक्तीची व्हिडिओ क्लिप देखील आढळून आली.  व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे लोकही त्यात दिसत आहेत.

द व्हॉईस न्यूजच्या संपादकानेही हा व्हिडिओ भिवंडीचा असल्याची पुष्टी केली.

याची पुष्टी करण्यासाठी, आम्ही the_voicenews चे संपादक फिरोज यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत व्हायरल व्हिडिओ शेअर केला.  ते म्हणाले की, व्हायरल झालेला व्हिडिओ भिवंडीतील आगीच्या घटनेचा आहे.  येथील रद्दीच्या गोदामाला आग लागली होती.  त्यांनी ती घटना कव्हर केली.

आमच्या तपासणीत हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले.

आमच्या तपासणीत हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले.  एका जळत्या गोदामासमोर अजान देत असलेल्या व्यक्तीचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील भिवंडी येथील आहे.  याचा हिंसाचाराशी काहीही संबंध नाही.

वस्तुस्थिती: जळत्या गोदामासमोर अजान देणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ संभळचा नसून महाराष्ट्रातील आहे.

(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे.’शक्ती कलेक्टिव्ह’चा भाग म्हणून ‘संकेत टाइम्स ऑनलाइन’ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here