तासगाव आगारात खासगी गाड्यांचे ‘वॉशिंग’

0
113

तासगाव : तासगाव आगारात बसेस धुण्याच्या रॅम्पवर खासगी गाड्यांचे ‘वॉशिंग’ होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.एका अधिकाऱ्याची खासगी बलेनो गाडी कर्मचाऱ्यांकडून वारंवार धुवून घेत असल्याचा‌ व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.आपण आगाराचे मालक असल्याच्या थाटात त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररित्या राबवून घेतले जात आहे.याप्रकरणी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.तासगाव येथील दत्त माळावर आगार आहे.

त्याठिकाणी सर्व बसेसचा मेंटेनन्स, इंधन भरणे, वॉशिंग अशी कामे होत असतात.याठिकाणी बसेस व फक्त सरकारी वाहनांचीच कामे होणे अपेक्षित आहे.रविवारी बसेस धुण्याच्या रॅम्पवर एक खासगी गाडी धुतली जात असल्याचा व्हिडिओ ‘व्हायरल’ झाला आहे. कर्मचाऱ्यांकडून आपली खासगी गाडी धुवून घेताना आपण अधिकारी असल्याचा त्यांच्याकडून गैरवापर केला जात आहे. कर्मचारीही साहेबांची नाराजी नको म्हणून त्यांची खासगी कामे करत आहेत. पण हे अत्यंत चुकीचे आणि बेकायदेशीर आहे.

याप्रकरणी सांगलीचे कर्तव्यदक्ष विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांचा असला चावटपणा त्यांनी खपवून घेऊ नये.त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here