डफळापूर : येथील माने टायर्स अँण्ड अँटोमोबाईलचे मालक युवा उद्योजक अंकुश माने यांना महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट सर्व्हिस करिता “ग्लोबल ग्लोरी अवॉर्ड” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.देवीदास ग्रुप ऑफ कंपनीकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सिनेअभिनेत्री भाग्यश्री यांच्याहस्ते श्री अंकुश माने यांना मुंबई येथे हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी त्यांच्या पत्नी वैशाली माने,ईश्वर हजारे उपस्थित होते.डफळापूर येथे सायकल दुरूस्ती दुकानपासून आपल्या व्यवसायची सुरूवात केलेले अंकुश माने यांची मोठे अँटोमोबाईल शोऱूम पर्यंतचा प्रवास संघर्षपुर्ण व प्रेरणादायी आहे.
सातत्याने नाविन्याची कास धरलेले माने यांनी आपल्या व्यवसायात अनेक बदल करत वेगळेपण जपले आहे.त्याचबरोबर सुमारे १५ जणांना रोजगार उपलब्ध करून देत सामाजिक उत्तरदायित्व स्विकारले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत अंकुश माने यांचा गौरव करण्यात आला आहे. दरम्यान माने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डफळापूर येथील उद्योजक अंकुश माने यांना ग्लोबल ग्लोरी अवॉर्ड पुरस्कार देताना सिनेअभिनेत्री भाग्यश्री बाजूस माने यांच्या पत्नी वैशाली माने उपस्थित होत्या.