जतच्या बाळकृष्ण गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल | कमी वजनाची गॅस विक्री, बिरनाळमध्ये प्रकार उघडकीस

0
232

ग्राहकांना देण्यात येणाऱ्या गॅस टाकीमध्ये वजन कमी असल्याचे ग्राहकामुळे उघड झाल्याने जत येथील बाळकृष्ण गॅस एजन्सीवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कमी वजनाच्या १५२ गॅस टाक्या व आयशर ट्रक जप्त करण्यात आला. तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी श्रीकांत चोथे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जत तालुक्यातील बिरनाळ येथे ग्राहकांना जत येथील बाळकृष्ण गॅस एजन्सी मार्फत गुरुवारी गॅस टाकीचे वाटप केले जात असताना सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बंडगर यांना गॅसमध्ये निर्धारित केलेल्या वजनापेक्षा गॅस कमी असल्याचा संशय आला. त्यांनी इलेक्ट्रिक वजन काट्यावर गॅसचे वजन केले असता दीड ते दोन किलो गॅस कमी असल्याचे निदर्शनास आले. बंडगर यांनी तहसीलदार धानोरकर यांच्याशी संपर्क साधत याची माहिती दिली. तहसीलदार धानोरकर यांनी पुरवठा निरक्षण अधिकारी श्रीकांत चोथे, वैध मापनशास्त्र निरीक्षक उदय कोळी, ग्राम महसूल अधिकारी संजय माने यांना तपासणीच्या सूचना दिल्या.

तहसीलदाराच्या सुचनेनंतर पथकाने बिरनाळ येथे भेट देत पंचनामा करत तपासणी केली. तपासाअंती गॅस कमी असल्याचे दिसून आले. आयशर गाडीमध्ये एकूण १५० घरगुती, दोन कमर्शियल टाक्या होत्या. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अनेक टाक्यांचे सिल उघडल्याचे निदर्शनास आले. १६ गॅस सिलिंडरची वजन करुन तपासणी केली. यामध्ये १२ गॅस सिलिंडरमध्ये एक ते दीड किलो गॅसचे वजन कमी असल्याचे निदर्शनास आले. यावेळी अरुण खांडेकर, नाना खांडेकर, अनिल पांढरे उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here