सांगली : बांधकाम कामगार नोंदणी,नुतणीकरण,लाभाचे अर्ज भरण्याचे काम रजिस्टर व केंद्रीय कामगार संघटनांना द्यावे,या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
मागण्याचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि,आता कामगाराचे नोंदणीसह अन्य लाभ योजनेसाठी प्रत्येक सेतू केंद्रामध्ये अर्जासाठी टोकन देण्यात येणार आहे.प्रथम ५० कामगारांनाच लाभाचे अर्ज भरता येणार आहेत.अन्य कामगार लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर परत फॉर्म भरण्यासाठी त्यांना कामाचा खोळंबा होणार असून, प्रवासासाठी खर्च सोसावा लागणार आहे. राजकीय पक्ष व काही संघटनांनी बोगस कामगारांची नोंदणी केली आहे. एजंट हे १५०० ते २००० रुपये रक्कम घेऊन बोगस नोंदणी करीत आहेत.
त्यामुळे नोंदणीकृत संघटनांना अर्ज भरण्याची परवानगी द्यावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेला पाच हजार रुपये बोनस द्यावा.थेट लाभ योजना तत्काळ बंद करावी व बोगस नोंदणीला आळा घालावा, आधी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात येत आहेत.यावेळी कॉ उमेश देशमुख,कॉ रेहाना शेख,कॉ हणमंत कोळी,संजय सुर्यवंशी, नानासो बुवा,वृषभ कोळी,बसवराज स्वामी, जावेद नदाफ,प्रशांत नाईक,समीर नदाफ, प्रकाश घारगे, सिकंदर जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.