संकल्प हवाच !

0
28

गतवर्ष २०२४ ला निरोप देत आपण २०२५ व्या वर्षात पदार्पण करत आहोत.जुने वर्ष सरताना आपण नव्या वर्षात संकल्प करत आहोत. प्रत्येकाने  आयुष्यात एकतरी दरवर्षी संकल्प केलाच पाहीजे.व तो पूर्णत्वास नेला पाहीजे.तेव्हाच त्याचे समाधान लाभते.जुने जाऊ द्या मरणालागी म्हणजे वाईट सर्व विसरून पुन्हा नव्या जोमाने काहीतरी करावे.आपल्याकडून एखादी गोष्ट करायची राहुन गेलेली असते.ती या वर्षाच्या निमित्ताने पुन्हा करण्याची संधी मिळालेली असते.नवीन वर्षात चांगले काय करता येईल याकडे पाहीले पाहीजे.

वर्षभरात अनेक सुख दुःखाचे प्रसंग आले असतील.ते सारे विसरून पुन्हा नव्या जोमाने नवी सुरवात करायला हवी.अनेकजण नववर्षात यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या पायवाटा शोधत असतात.३१ डिसेंबर गतवर्षाला निरोप देत असताना मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करत असतात.वर्षभरात जसजसे दिवस सरत जातात.तसतसे आपले आयुष्यदेखील कमी होत चालले आहे.हे विसरता कामा नये.येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी खुप महत्वाचा आहे.रोज नवनवीन गोष्टी केल्या पाहीजेत.नव्या संकल्पाची बांधणी करतानाच आपले अर्धवट राहीलेले संकल्प पूर्णत्वास नेले पाहीजे.

संकल्प प्रत्येकाचे वेगवेगळे असतात.व्यायाम,पर्यटन,सायकलींग,रोजनीशी लिहण्याचा ,कुणाला आर्थीक नियोजन,बचत,असे अनेक वेगवेगळे संकल्प असतात.मीही दरवर्षी कोणताना कोणता संकल्प करीत असतो.मी वाचन,लेखन,रोजनीशी,पञमैञी आजतागायत संकल्प जोपासला आहे.यावर्षी मी दोन पुस्तकांचे लेखन करून ते प्रकाशीत करणार असल्याचा संकल्प केला आहे.

नक्कीच मी तो पूर्ण करणार ही आशा आहे.संकल्प हा केवळ करायचा नसतो.तर काही काळापुरता मर्यादीत न राहता.पूर्ण होईपर्यंत मेहनत केली पाहीजे.संकल्प हे आपल्याला सकारात्मक दृष्टीकोन देत असतात.केलेले संकल्प प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे असते.आपण कोणता संकल्प केला आहे.केला नसेल तर अवश्य करा.व प्रत्यक्षात उतरवा.त्यासाठी जीवनात संकल्प हवाच !

संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी,(श्रीगोंदा)
मो.७७२१०४५८४५ 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here