जत : जत शहरातील मदनेवस्ती येथे अज्ञात चोरट्याने मंगळसूत्रासह दोन मोबाईल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.लहु विश्वनाथ खडतरे (वय ४०) हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत ओळखीच्या कोंडाबाई बिरा मदने यांच्या घरासमोर झोपले होते.
अज्ञात चोरट्याने फिर्यादीची पत्नी नलिनीच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत ५०,००० रुपये) आणि दोन मोबाईल वनप्लस (किंमत १०,००० रुपये,) सॅमसंग मोबाईल (किंमत १०,००० रुपये) चोरून नेले.चोरी झालेल्या मालाची एकूण किंमत ७०,००० रुपये आहे. लहु खडतरे यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.