जत : जत तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना वेळेत व सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा त्याही वेळेत मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे,असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत शहरात होत असलेल्या नविन उपजिल्हा रुग्णालय इमारतीची पाहणी केली.जुन्या ग्रामीण रुग्णालयातील समस्या जाणून घेवून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी डाॅ.रविंद्र आरळी,अप्पासाहेब नामद काका,आण्णा भिसे,संजय तेली,भाऊसाहेब दुधाळ,अनिल पाटील,प्रकाश मोटे तसेच सर्व मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार पडळकर पुढे म्हणाले,जत शहरासह तालुक्यात नागरिकांची संख्या मोठी त्यातच जत तालुक्यातील अनेक गावे लांब व दरिखोऱ्यात आहेत.त्यांना आरोग्य सेवा वेळेत मिळत नाही.यापुढे प्रत्येक नागरिकांना यापुढे वेळेत आरोग्य सेवा पोहचल्या पाहिजेत.तालुक्यात नव्याने होत असलेले जत उपजिल्हा रुग्णालय लवकारत लवकर पुर्ण होऊन येथे सर्व प्रकारचे उपचार,शस्ञक्रिया व्हाव्यात यादृष्टीने मी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.त्याशिवाय आरोग्य केंद्रे,उपकेंद्रातील डॉक्टर्स,कर्मचाऱ्यांनी आपले योगदान द्यावे,असेही आ.पडळकर म्हणाले.
जत : आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत उपजिल्हा रुग्णालय इमारतीची पाहणी केली.