जत : म्हैसाळ,ता.मिरज येथे जत तालुक्यासाठी जिवनदायी ठरणारी सुधारीत म्हैसाळ योजनेचे आवर्तन आमदार गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते सुरू करण्यात आले.तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायत शेती वाढत असून म्हैसाळचे पाणीच या शेतीला आधार ठरत असून गत काही दिवसापासून म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी होत होती.
अखेर म्हैसाळचे पंप सुरू करण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी नोंदवावी,असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.पुढील दोन-चार दिवसात जत तालुक्यात पाणी दाखल होणार आहे.
यावेळी अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे,कार्यकारी अभियंता रोहित कोरे,अप्पासाहेब नामद,युवा नेते संजय तेली तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.पडळकर म्हणाले, जत तालुक्यासाठी जीवनदायी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाचा शुभारंभ संपन्न झाला.ही योजना तालुक्यातील शेतीसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असून शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल.
म्हैसाळ ता.मिरज येथे पंपगृह येथे म्हैसाळच्या मोटारी चालू करताना आमदार गोपीचंद पडळकर व अधिकारी