डफळापूर : डफळापूर-अंनतपूर महामार्गाचे अडीच किलोमीटरचे काम रखडल्याने वाहनधारकांना मोठी अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.याच मार्गावर श्रीपती शुगर कारखाना असल्याने त्यांच्या ऊसवाहतूक वाहनांचीही मोठी गैरसोय होत आहे.गेल्या अडीच महिन्यापुर्वी धडाक्यात शुभारंभ होऊन कामास सुरूवात झाली होती.प्रत्यक्षात कामही झाले आहे,मात्र गेल्या महिन्या भरापासून हे काम रखडल्याने वाहन धारकासह नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तातडीने हे रखडलेले काम सुरू करून पुर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जत तालुक्याला कर्नाटकाशी जोडणारा हा महत्वाचा राज्य महामार्ग आहे.कर्नाटक बाजूने महाराष्ट्र हद्दीपर्यतं कौतुक करण्यासारखे काम झाले आहे.मात्र महाराष्ट्र हद्दीत जतच्या बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे महामार्गाचे तीनतेरा झाले आहे.रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम आता पुढे गेले असून दोन-अडीच किलोमीटरचे टप्पे करत काम करण्यात येत आहेत.त्यात दोन टप्याचे डांबरीकरण झाले आहे,तेही दर्जाहीन असून खड्डे पडत आहेत.
तर सध्या डफळापूर तलावापासून शेळकेवाडी क्रासपर्यतचे काम सुरू आहे.काही प्रमाणात मुरमीकरण करण्यात आले आहे.मात्र रुंदीकरणाची काम तशीच पडल्याने एकेरी मार्ग सुरू आहे.काही ठिकाणी अवजड वाहनामुळे मुरमीकरण उखडून खड्डेच खड्डे पडले आहेत.महामार्गाचे काम सुरू आहे,मात्र सध्याची स्थिती पाहता पाणंद रस्ता बरा म्हणायची वेळ आली आहे.जतच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून काम तातडीने पुर्ण करावे,अन्यथा कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा नागरिकांसह,वाहनधारकांनी दिला आहे
डफळापूर : खड्डेयुक्त मार्गामुळे ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टर चालकांचे बेहाल होत आहेत.