सांगली: विभागीय सैनिक बोर्ड पुणे यांनी कळविल्यानुसार डॉक्टर व परिचारिका पदे शासनाच्या ग्रामीण व शहरी रुग्णालयांना कंत्राटी व करार पद्धतीने मेस्कोमार्फत भरण्यात येणार आहेत. तरी या पदासाठी इच्छुक माजी सैनिक व पाल्य यांनी योग्य त्या अर्हता प्रमाणपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.