शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे,| खा.विशाल पाटील,महेश खराडे ; नागपूर- रत्नागिरी महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन

0
8

सांगली : शेतकऱ्यांना उध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. तो रद्दच झाला पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन कारण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्दच झाला पाहिजे त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशारा खा.विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. 

या आंदोलनाचे नेतृत्व खा विशाल पाटील, स्वाभिमीनीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले.सदर आंदोलन शक्तिपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीने करण्यात आले. भर पावसात महिलासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.पावसात ही शेतकरी तशुभर ही जागचे हलले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्या इतकाच जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रास्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला. रस्त्याच्या दुतरफा  पाच ते सहा किलोमीटरच्या वाहणाच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे एक ऍम्ब्युलन्स आली त्यावेळी मात्र तात्काळ वाट करून देण्यात आली.

शेती आमच्या हक्काची नाही, नाही कुणाच्या बापाची, या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील जैन वडा चौकात रस्त्यावर च  ठिय्या मारला यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती. 

यावेळी आंदोलका समोर बोलताना खा विशाल पाटील म्हणाले आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र या महामार्गांवर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. किती भराव टाकला जाणार आहे, त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल त्यांचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. 

महेश खराडे म्हणाले आहे कृषी दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर बसावे लागत आहे ही शोकांतिका आहे. वर्धा गोवा अर्थात शक्तिपीठ महामार्गची कुणाचीही मागणी नाही, ना शेतकऱ्यांची, ना भाविकांची, मग कुणाचीही मागणी नसताना कुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी का उध्वस्त व्हायचे, शेतकऱ्यांनी का भूमिहीन व्हायचे, शेतकऱ्यांनी का कवडीमोल किमतीने जमिनी द्यायच्या हा खरा सवाल आहे. या महामार्गसाठी शासन 20 हजार कोटीचे कर्ज काढणार आहे. त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग करू नये असा अभिप्राय दिला आहे म्हणजेच अर्थ खात्याचा विरोध, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही तो डावलून पोलिसी बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरु आहे.

हा अट्टाहास कशासाठी सुरु आहे. ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, आमदार, खासदार जगविण्यासाठी सुरु आहे हे स्पष्ट होते. पण आम्ही हे होऊ देणार नाही प्रसंगी हातात शस्त्र घ्यावे लागले तरी बेहत्तर, नक्सलवादी व्हावे लागले तरी चालेल मात्र काळी आईला आम्ही फुकणार नाही यावेळी प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, सौ शुभगिनी शिंदे, सौ लता कांबळे, बाळासाहेब पाटील, आदिनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी, आदिसह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होते. 

*महेश खराडेसह सहा जणांना अटक व सुटका*

आंदोलना दरम्यान महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले शांतीनाथ लिंबेकाई आदिना अटक करण्यात आले. त्यानंतर त्यांची सुटका झाली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here