— पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेअंतर्गत ऐतिहासिक निर्णय
जत : जत तालुक्यातील मुचंडी येथील प्रसिद्ध श्री रामेश्वर देवस्थानाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजने’अंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याची आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या निर्णयामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.
या निर्णयामुळे भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून, देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास, स्थानिक पर्यटनाला चालना तसेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण जत तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.
ही ऐतिहासिक विकासपर प्रक्रिया साकार करण्यासाठी सदैव सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री मा. जयाभाऊ गोरे यांच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय शक्य झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
भक्ती, परंपरा आणि विकास यांची सांगड घालणारा हा निर्णय परिसरासाठी परिवर्तनकारी ठरणार असून, श्री रामेश्वर देवस्थानाच्या आध्यात्मिक वारशाला नवचैतन्य मिळणार आहे.




