आष्टा : जमीन गहाण ठेवण्याच्या व्यवहारातून सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आष्टा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विनायक विलास सपकाळ व अमित पवन कोळी (दोघे रा. आष्टा) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत सुदेश संजय भोळे (वय ३३, रा. चव्हाणवाडी, आष्टा) यांनी फिर्याद दिली. आरोपींनी पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मर्देवाडी येथील जमीन गहाण स्वरूपात मुदत खरेदी देण्याचे सांगून ऑनलाइन, चेक व रोख स्वरूपात सात लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
२४ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यवहार करूनही जमिनीचा ताबा न दिल्याने फसवणूक झाल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या अर्जानंतर चौकशी करून ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२) व ३(५) नुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास पोलिस हवालदार एम. एम. कांबळे करीत आहेत.




