जतचे डिवायएसपी नाकाबंदीसाठी रस्त्यावर

0
4



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट वाढतच असल्याने विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी,चारचाकी वाहन धारकावर जत पोलीसांनी दंडात्मक कारवाई कडक केली आहे. गेल्या काही दिवसापासून थेट डिवायएसपी रत्नाकर नवले रस्त्यावर उतरत असल्याने कारवाई टाईट झाली आहे.





जत‌ शहरासह ग्रामीण भागाला कोरोनाने विळखा घातला असून दररोज दोनशेवर रुग्ण आढळून येत असल्याने धोका वाढला आहे. जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध घालूनही बेपर्वार्ह नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत असून कोरोना वाढीस यामुळे बळ मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून दस्तूरखुद्द डिवायएसपीच रस्त्यावर वाहने आडविण्याची कारवाई करत असल्याने नेमणूक करूनही काम चुकारपणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणालले आहे.जत‌ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस गेल्या काही दिवसापासून डिवायएसपी नवले यांच्याबरोबर नाकाबंदीसाठी विजापूर-गुहागर रस्त्यावर दिसत आहेत.दररोज मोठ्या प्रमाणात वाहनावर दंडात्मक कारवाई होत असल्याने काहीअंशी विनाकारण फिरणाऱ्यावर नियंत्रण आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here