कोविड लढाईतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण करा

0
5



भिवर्गी,संकेत टाइम्स : पोलीस व शासकीय डॉक्टर परीवरसह कोविड विरुद्ध लढाईत आघाडीवर राहिलेले अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे,अशी मागणी भिवर्गिचे सरपंच मदगोंड सुसलाद व उपसरपंच बसवराज चौगुले यांनी केली आहे.

कोविड महामारीच्या काळात जे अग्रेसर आहेत,






ते डॉक्टर,पोलीस,सफाई कर्मचारी, वीज महामंडळातील कर्मचारी व आरोग्य कर्मचारी अशा व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले, मात्र या लढाईत आघाडीवर राहिलेला व्यक्तीच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना अद्याप लसीकरण झालेले नाही,असे आढळते. ही मंडळी आजही कोविड विरुद्धचा लढाईत आघाडीवर राहून काम करत आहेत.लासिकरणासाठी ऑनलाईन प्रयत्न करूनही यांचे नंबर लागेना.

महामारी कोरोना लढाईत लढत असलेला स्वतःच्या कुटुंबातील सदस्य असुरक्षित आहेत ही भावना या फ्रंट लाईन वरील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मनोबल खचविणारे ठरत‌ आहे. यामुळे वरील बाबींचा विचार करून पोलिस कर्मचारी सह, फ्राँटलायीन वरील कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व अधिकाऱ्यांचे कुटुंबातील सदस्यांना प्राधान्याने लसीकरणची व्यवस्था करण्यात यावी,अशी मागणी सरपंच सुसलाद व उपसरपंच चौगुले यांनी शासनाकडे केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here