जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील तोळबंळवाडी(मुंचडी)येथील युवकाचा तीस रुपये मागितलेचे कारणावरून गळा आवळून लाथाबुक्यांनी मारहाण करून खून केल्याचा प्रकार मंगळवारी सायकांळी 7.00 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.अरूण शामू मलमे वय 20,रा.तोळबळवाडी(मुंचडी)असे मयत युवकांचे नाव असून याप्रकरणी त्याचा मित्र रमेश फकीराप्पा पाटोळे रा.तोळबळवाडी (मुंचडी)यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,अरूण मलमे व रमेश पाटोळे हे दोघे मित्र आहेत.नेहमीप्रमाणे ते मंगळवारा सकाळी दहा वाजता मलमे यांची दुचाकी घेऊन गेले होते.त्यानंतर सायकांळच्या सुमारास रमेश यांने दुकानदार अंकुश हणंमत पाटोळे यांच्याकडून तीस रूपये अरूण द्यासचे आहेत म्हणून मागून घेतले होते.त्यांनतर दोघे कन्नड शाळेजवळ गेले तेथे त्या दोघात भांडण झाले.
रमेशने अरूण याला खाली पाडत छातीवर बसून गळा आवळून लाथाबुक्यांनी मारहाण करून खून केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मयत अरूण यांचे वडील शामू गुंडू मलमे यांनी पोलीसात फिर्याद दिली असून रमेश फकीराप्पा पाटोळे यांच्या विरोधात जत पोलीसांनी 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.