म्हैसाळचे पाणी महाआघाडीचे सामूहिक यश ; आप्पाराया बिराजदार

0
2

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात सध्या म्हैसाळ योजनेच्या कँनॉल,बंदिस्त पाईपलाईनमधून सोडण्यात येत असलेले पाणी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांतत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जलसंपदा मंत्री, संबधित विभागाकडे सातत्याने पाठपुराव्यामुळे आले आहे.तालुक्यातील प्रत्येक भागात‌ पाणी पोहचविण्याचे आमदार सांवत यांनी जनतेला आश्वासन दिले आहे. त्यांची पुर्तता ते करत आहेत.त्यामुळे पाणी आम्ही आणले म्हणून श्रेयवाद कोणी करू नये,असे आवाहन कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी केले आहे. यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग उपस्थित होते.





बिराजदार म्हणाले,सध्याचे शासन महाविकास आघाडीचे असून हे श्रेय तिन्ही पक्षाला येते.हे त्यांनी लक्षात ठेऊन बोलावे,आज काही मंडळी स्व:ताच्या नेत्याला खुश करणेसाठी त्यांनी हा धंदा चालू केला आहे.जलसंपदा मंत्री जयंंत पाटील यांना माननारे नेते आघाडी असतानाही विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा आदेश धुडकावन त्यांनी वेगळी चूल मांडली होती.ते मंत्री पाटील यांना चांगले लक्षात आहे.तसेच आपली वेगळी चूल मांडून निवडणूक लढवली.जनतेनी त्यांना जागा दाखविली आहे.





या योजनेसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,आ.विक्रमसिंह सावंत,खा.संजय काका पाटील यांनीही प्रयत्न केलेत, हे जनतेला चांगले माहिती आहे.म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्याची धमक आ.विक्रमसिंह सात यांच्याकडे आहे. म्हणून गत‌ विधानसभा निवडणूकीत प्रचंड मतांनी जनतेने निवडून दिले आहे. विरोधकांना जनतेनी जागा दाखवून दिली आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवावे.सदर विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण झाल्यानंतरही अजून 42 गावे वंचित राहतात.त्या गावांना सिंचन योजनेतून पाणी मिळवण्यासाठी यापुढे जनतेला सोबत घेऊन आंदोलन उभे करणार असल्याचे बिराजदार यांनी सांगितले. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here