जत,संकेत टाइम्स : जत पुर्व भागातील गेल्या तीन तपापासून सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या उमदी परिसरातील शेतकऱ्यांना सध्या म्हैसाळ योजनेतून बंधिस्त पाईपलाईनमधून पाणी सोडण्यात येत आहे.ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या प्रयत्नातून आले आहे,त्यामुळे स्वप्नपुर्ती झाली म्हणून कुणीही श्रेय घेऊ नये,असे आवाहन माजी सभापती तम्मणगौडा रवीपाटील यांनी पत्रकार बैठकीत केले.यावेळी भाजप नेते सोमलिंग बोरामणी,संजय तेली उपस्थित होते.
रवीपाटील म्हणाले,जत तालुक्यात सध्या कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तेथे जनतेला वाचविण्याची गरज आहे. मात्र काही पक्षाचे नेते भाजपाच्या प्रयत्नातून आलेले पाणी तीन वर्षापूर्वीचे स्वप्न पुर्ण झाले म्हणत आहेत.मात्र गेल्या तीस वर्षात अनेक वर्षे सत्तेत असताना पाणी का आले नाही,नुसते श्रेय घ्यायचे म्हणून काहीही करू नका,जनतेला सर्वकाही माहिती आहे,प्रत्येकांचा हिशोब होतोय,असेही रवीपाटील म्हणाले.
सोमलिंग बोरामणी म्हणाले,जत पुर्व भागातील उमदी या एका गावासाठी पाणी आले म्हणून कुणीही राजकीय फायदा घेऊ नये,खऱ्या अर्थाने पाणी आणायचे असेलतर संख,कोंतेबोबलाद,दरिबडची, गिरगाव,या भागातील तलावात पाणी सोडा,मगच खऱ्या अर्थाने तुमचे प्रयत्न ठरतील.त्यावेळी आम्ही तुमचा सत्कार करू.
संजय तेली म्हणाले,उमदी परिसरात म्हैसाळचे पाणी यावे,यासाठी मी केल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहे.सध्या आलेले पाणी चाचणीचे आहे,तेही गतवेळी आमदार जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहे.अगोदर पुर्ण क्षमतेने पाणी आणा.सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट झाली असून अशा बाधित रुग्णाचा मदत करण्याची भूमिका ठेवावी.