तासगाव येथे उभारण्यात येत असलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतील उपचारांसाठी सज्ज करा ; जिल्हाधिकारी

0
2



सांगली : तासगाव नगरपरिषदेच्यावतीने तासगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे काम लवकरात लवकर पूर्ण करून हे हॉस्पीटल कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने रूग्णांच्या उपचारासाठी सज्ज करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

            




तासगाव नगरपरिषदेच्यावतीने तासगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. काटकर, मिरज उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे, पोलीस उपअधिक्षक अश्विनी शेंडगे, तहसिलदार कल्पना ढवळे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी गोसावी,तालुका आरोग्य अधिकारी ए. एस. सुर्यवंशी, तासगाव नगरपरिषदेचे प्रभारी आरोग्य निरीक्षक प्रताप घाटगे, नगरअभियंता एम.एम. नदाफ, सल्लागार अभियंता भालचंद्र सावंत आदि उपस्थित होते.

            




जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी तासगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलची पहाणी करून इलेक्ट्रीक, ऑक्सिजन प्लाँट उभारणी, फायर फायटींग सुविधा, बेड्स, आयसीयु युनिट, लहान मुलांच्याकरिता वॉर्ड आदि सुविधा विहीत निकषाप्रमाणे कराव्यात, अशा सूचना संबंधितांना दिल्या. या हॉस्पीटलच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासनामार्फतही आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील. हे हॉस्पीटल सर्व पायाभूत सुविधांची पूर्तता करून महिन्याभरात सज्ज होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तासगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये 100 ऑक्सिजन बेडचे नियोजन असून यामध्ये एक वॉर्ड लहान मुलांच्याकरिता असणार आहे. तसेच 6 के.एल. क्षमतेचा ऑक्सिजन प्लाँटही उभारण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व रूग्णांच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे व विविध निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



           

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here