उमदी,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी पुर्ण लॉकडाऊन करत निर्बंध घातले आहेत.तरीही सोन्याळ येथे बेजबाबदार दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवली होती.
अशी 11दुकाने आपत्ती व्यवस्थापन समिती,उमदी पोलीसांनी सील केली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिले निर्बंधांचे कडक अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या,त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाणे हद्दीतील सोन्याळ गावी व्यवस्थापन समिती सोन्याळ आपत्ती व्यवस्थापन समिती सोन्याळ व पोलीस प्रशासन यांनी जिल्हाधिकारी याचे आदेशाचे भंग करणारे
सोन्याळ गावामध्ये गुरुराज पुजारी यांचे मोबाईल शॉपी,रसूल दस्तगीर नदाफ यांचे किराणा दुकान, गुरु निंगाप्पा मुचंडी यांचे मोबाईल शॉपी, मल्लिकार्जुन निवर्गी यांचे किराणा दुकान,महबूब साहेबलाल नदाफ यांचे किराणा दुकान,कुटबुद्दिन जमाल नदाफ यांचे किराणा दुकान,सोमनिंग बसवंत पुजारी यांचे कृषी सेवा केंद्र,गुरुसिद्ध धुळा बिराजदार यांचे किराणा दुकान, लिंबू रमणा परीट यांचे हॉटेल भारत,जैनुद्दीन दस्तगीर नदाफ यांचे किराणा दुकान,दर्याप्पा नागप्पा कांबळे यांचे किराणा दुकान अशी एकूण अकरा दुकाने सील करण्यात आली.
तसेच उमदी गावातील किराणा दुकानदार गुरु निंगाप्पा रामाप्पा होनोर याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे भंग करून किराणा दुकान चालू ठेवले म्हणून त्यांच्यावर 10 हजार रुपयाचा दंड केला आहे.
उपनिरिक्षक नामदेव दांडगे,पोलीस हवालदार पलुसकर,पोलीस नाईक बन्नेनवर, पोलीस कॉन्स्टेबल श्री.गोदे श्री. हाके,श्री.कुंभारे यांनी हि कारवाई केली.
सहकार्य करा ; कोळेकर
कोरोनाचा प्रभाव अजूनही कायम आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी वाढविलेल्या लॉकडाऊनचे कडक पालन व्यापाऱ्यांनी करावे,कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासन धोका पत्करून काम करत आहेत, त्यांना साथ द्यावी.
दत्तात्रय कोळेकर
सा.पोलिस निरिक्षक
सोन्याळ ता.जत येथे मनाई आदेश असताना सुरू ठेवलेली दुकाने सील केली.








