तासगाव : तासगाव तालुक्यातील सावर्डे येथील अमोल पाटील या युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या तासगाव पोलिसांचा सन्मान केला. केळी, मास्क आणि सॅनिटायझर देऊन पाटील यांनी पोलिसांना सन्मानित केले.
सावर्डे येथील अमोल पाटील यांचे भिवघाट (ता. खानापूर) येथे अनुष्का इरिगेशन सिस्टम्स हे ठिबकचे दुकान आहे. आपला व्यवसाय करीत – करीत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून ते सामाजिक कार्य करीत असतात.
नुकताच त्यांचा वाढदिवस झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साधेपणाने त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांनी कोरोनाकाळात रात्र – दिवस आपल्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे सेवा बजावणाऱ्या तासगाव पोलिसांचा सन्मान केला. यानिमित्ताने त्यांनी पोलिसांना केळी, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी हे साहित्य देऊन कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान केला.
यावेळी खासदार संजय पाटील यांचे स्वीय सहाय्यक दीपक अमृतसागर यांच्यासह अमोल पाटील यांचे मित्रमंडळी उपस्थित होते.








