संख : वादळी वाऱ्याने पोल्ट्री कोसळून
पांढरेवाडी (ता. जत) येथील विजय
धोंडीराम म्हानवरयांचे 2 लाख 78 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले.200 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली.पूर्व भागातील पांढरेवाडी येथील म्हानवर वस्तीवर विजय धोंडीराम म्हानवर यांची घराजवळ पोल्ट्री आहे.चार महिन्यांपूर्वी अडीच लाख रुपये खर्च करून ती उभी केली होती. त्यामध्ये 1500 कोंबड्या होत्या. पूर्ण तयार झालेल्या अडीच किलो वजनाच्या 1300 कोंबड्यांची विक्री झाली केली आहे,
तर 200 कोंबड्या शिल्लक होत्या.गुरुवारी रात्री आठ वाजता सोसाट्याचा वारा सुटला. त्यात पोल्ट्री भुईसपाट झाली.200 कोंबड्यांवर पत्रा,सिमेंटचे खांब पडले. त्यामुळे कोंबड्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या. शेड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकूण 2 लाख 78 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी सचिन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.






