कोरोनामुक्त रुग्णाचा आकडा वाढला,तरीही धोका कायम | जत पश्चिम भागातील 14 गावात रुग्ण ; गावनिहाय सर्व्हे सुरू

0
5



डफळापूर, संकेत टाइम्स ; जत पश्चिम भागातील कोरोना रुग्णाचा आकडा स्थिर असून कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढली आहे. डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अतर्गंत 14 गावात कोरोना रुग्णाची संख्या वाढली होती.दुसऱ्या लाटेत शनिवार अखेर पर्यत 338 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैंकी 179 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.






तर 159 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चोथे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे कोरोना रोकण्यात काहीअंशी यश मिळतानाचे चित्र आहे. नागरिकांचा मास्क,सोशल डिस्टसिंग, सँनिटायझरचा वापरचं कोरोना धोका कमी करू शकतो.अन्यथा स्थिती पुन्हा बिघडू शकते.

प्रत्येक गावातील ग्रामपंचायती कडून पुढील काही दिवस सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील गावात आता संशयित नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. 





त्यापैंकी कुडणूर,मिरवाड,शिंगणापूर येथे सर्व्हे पुर्ण झाला आहे. या तिन्ही गावातील संशयित दोनशे नागरिकांची अन्टेजन टेस्ट घेण्यात आली आहे.त्यात कुडणूर 35,मिरवाड 17,शिंगणापूर 13 असे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.या सर्व्हेमुळे मोठ्या संख्येने कोरोना तपासणी झाल्याने भविष्यात नव्या रुग्णाचा आकडा कमी होणार आहे.

पश्चिम भागात कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण संख्या कमी होती,मात्र दुसऱ्या लाटेत अचानक रुग्ण वाढल्याने चिंता वाढली होती.14 गावात तब्बल एकूण 338 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.






सध्या सर्व गावे लॉकडाऊन आहेत.त्यामुळे रुग्ण वाढ काहीअंशी स्थिर झाली आहे.179 रुग्ण दुसऱ्या लाटेत कोरोना मुक्त झाले आहेत. तर डफळापूर मधिल 60 वर्षीय पुरूष,45 वर्षीय महिला ,डोर्ली मधिल65 वर्षीय महिला,60 वर्षीय पुरूष, खलाटी येथील 55 वर्षीय पुरूष,बाज येथील 70 वर्षीय महिला, मिरवाड येथील 78 वर्षीय पुरूष,तर कुडणूर येथील 75 वर्षीय महिला आठ जणाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.





सध्या डफळापूर, बेंळूखी,डोर्ली,कुडणूर, येथे 30 पेक्षा जादा रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे ही गावे सध्या धोक्याच्या स्थितीत आहेत.डफळापूर एकूण रुग्ण 138,कोरोनामुक्त 87,बाज एकूण रुग्ण 14, कोरोनामुक्त 11,अंकले एकूण रुग्ण 15 कोरोनामुक्त 6,डोर्ली एकूण रुग्ण 32 कोरोनामुक्त 12,बेंळूखी एकूण रुग्ण 33 कोरोना मुक्त 13,कंठी एकूण रुग्ण 5, कोरोनामुक्त 4,बागेवाडी एकूण रुग्ण 10, कोरोनामुक्त 6,वाषाण एकूण रुग्ण 5, कोरोनामुक्त 3,खलाटी एकूण रुग्ण 18, कोरोनामुक्त 8,जिरग्याळ एकूण रुग्ण 10 कोरोनामुक्त 4,एकुंडी एकूण रुग्ण 8 कोरोनामुक्त 3,मिरवाड एकूण रुग्ण 17 कोरोनामुक्त 3,शिंगणापूर एकूण रुग्ण 13, कोरोनामुक्त 5,कुडणूर एकूण रुग्ण 35,कोरोनामुक्त 10 असे 14 गावात एकूण 338 बाधित रुग्णापैंकी 179 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तर अजून 159 रुग्ण उपचाराखाली आहेत.



तपासणी वाढविली

डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रसह दररोज एका गावाचा सर्व्हे करत तपासण्या वाढविल्या आहेत.त्यामुळे संसर्ग रोकण्यास मदत झाली आहे.रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली आहे. केंद्रात कोरोना रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यात येतात.होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णावर आशाकडून लक्ष ठेवले जाते,त्याची दररोज तपासणी औषधे दिली जातात.कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद आहे.


डॉ.अभिजीत चोथे

वैद्यकीय अधिकारी,डफळापूर



डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघात कोरोना रुग्ण दुसऱ्या लाटेत वाढले आहेत. डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रात रुग्णांना तात्काळ उपचार दिले जातात.आम्ही सातत्याने सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून आहोत.ग्रामपंचायतीची यंत्रणाही अलर्ट आहे.तपासणी,लसीकरण जनजागृत्ती मुळे सध्या कोरोना रुग्ण वाढीचा आकडा स्थिर आहे.डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सीजन युक्त पाच बेडची सोय असल्याने रुग्णांना मदत होत आहे. ज्या गावात जास्त रुग्ण आहेत,अशा गावांचा सर्व्हे केला जात असल्याने रुग्ण वाढीचा आकडा कमी होईल.


दिग्विजय चव्हाण

सदस्य,पंचायत समिती जत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here