जत तालुक्याला विकास कामासाठी सीएसआर फंडातून 35 लाख मंजूर

0
7



वळसंग संकेत टाइम्स : जत तालुक्याचे  आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून तालुक्यात अनेक कामे मंजूर करून सुरू करण्यात आली आहेत.. पाणी प्रश्न, स्थानिक विकास अंतर्गत, मंदिर जीर्णोद्धार पासून ते वैयक्तिक  जनतेच्या कामांना प्राधान्य देणारे आमदार सावंत यांच्या प्रयत्नातून सीएसआर मार्फ़त महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळ मर्या. मधून 35 लाख रपये मंजूर झाले. 






जत तालुक्यातील सोनलगी येथील अंबाबाई मंदिर व सांस्कृतिक भवन,वळसंग येथील पुरातन काळातील ऐतिहासिक मंदिर समोरील सभामंडप, कुडनूर येथील कर्लहट्टी रस्त्याची दुरुस्ती व मुरमीकरण,खडीकरण आणि तिकोंडी येथील विठ्ठल मंदिरासमोरील सभामंडप यासाठी एकूण 35 लाख रुपये मजूर झाले आहेत. या मंजुरीमूळे ऐतिहासिक वास्तू व रखडलेल्या कामाचा शुभारंभ होईल आणि विकासाचा दर नक्की वाढणार असल्याने कामाचे कौतुक तालुकभर होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here